लातूरच्या पीव्हीआर चौकात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा. - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांची मागणी.

लातूरच्या पीव्हीआर चौकात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा.  


 - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांची मागणी. 


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


लातुर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, थोर स्वातंत्र्य सेनानी, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे लातूर जिल्हा निर्मिती मध्ये असलेले योगदान आणि एकूणच लातूर जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे. नव्या पिढीला त्यांनी केलेले कार्य हे अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी लातुर शहरातील बार्शी रोडवरील पीव्हीआर चौकात अतिशय शानदार असा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व लातूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच पत्रकार बांधवांनी एकत्रित येऊन या थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा भव्यदिव्य असा पूर्णाकृती पुतळा उभा करून लातूर शहराचे वैभव वाढवावे. तसेच हा पुतळा उभारण्यासाठी लातूर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पीव्हीआर चौकातच उभा केला जावा अशी मागणी पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केलेली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image