प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने कोव्हीड योद्धांचा सन्मान
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव सुर्जी : गेल्या पाच महिन्यापासून कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्तव्यावर ठाम उभे राहून नागरिकांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर सुधीरकुमार डोंगरे व त्यांचे टीमचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने कोव्हीड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांनाही संघटनेचे वतीने कोव्हीड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष गजानन हुरपडे, मानव सेवा विकास फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे शहराध्यक्ष मो. वसीम मो राजिक यांच्या विशेष सहकार्याने डाॅक्टर,नर्स, पोलीस यांना प्रत्यक्ष तर आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष गजानन हुरपडे,शहराध्यक्ष मो. वसीम मो. राजिक व संघटनेचे पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.