प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा इम्पॅक्ट, कोरोनाबाधित पत्रकारांस तात्काळ उपचार व उच्च दर्जाचा मिळाला आहार

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा इम्पॅक्ट


कोरोनाबाधित पत्रकारांस तात्काळ उपचार व उच्च दर्जाचा मिळाला आहार 


महाराष्ट्र २४ आवाज



जिल्हा प्रतिनिधी- अनिल राठोड


यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथील कोरोनाबाधित पत्रकार अमोल व्हडगिरे यांना डाॅक्टरांनी अमानुष वागणूक देत शिवीगाळ केली होती . सदर डाॅक्टरांवर योग्य ती कार्यवाही करून कोरोनाबाधित पत्रकार अमोल व्हडगिरे यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्यात यावेत यासंदर्भात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,यवतमाळच्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यवतमाळचे जिल्हाधिकारी व बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन कोरोनाबाधित पत्रकारांस न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेऊन कोरोनाबाधित पत्रकार अमोल व्हडगिरे यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू करण्यात आले असून उच्च दर्जाचे भोजन व फळे देण्यात येत आहेत. पत्रकार असलेल्या या रूग्णाने यवतमाळ येथील कोविड केंद्रात खोकल्याची मुदत बाह्य औषधी रूग्णांना देण्यात येत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल केला होता ,शिवाय येथील जेवणाचा निकृष्ठ दर्जा व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेबद्दल माहिती फोटोसह व्हायरल केला होता या एकूणच प्रकरणाने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेल्याने शासकीय रूग्णालयाच्या कोविड केंद्रात कर्तव्यावर तीन डाॅक्टरांनी या कोरोनाग्रस्त रूग्णासोबत असभ्य वर्तन केले व शिवीगाळ करीत त्यांचा पसारा बाहेर फेकण्याची धमकी दिली होती ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास समजताच संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, कार्याध्यक्ष संजय सल्लेवाड, कोषाध्यक्ष गजानन गंजेवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष उदय पुंडे, सचिव मोहन कळमकर, स्वप्निल चिकाटे, विलास घोडे, भास्कर देवकत्ते, डाॅ. दिनेश जयस्वाल या संघटनेच्या पदाधिकारी यांनी पत्रकारांस अमानुष वागणूक देणा-या डाॅक्टरांच्या विरोधात आवाज उठविल्याने कोरोनाबाधित पत्रकार अमोल व्हडगिरे यांच्यावर योग्य उपचार सुरू करण्यात आले असून उच्च दर्जाचा आहारही दिला जात असल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पत्रकार बांधवानी आभार मानले आहेत.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image