बीडच्या तरूणाने महाड ईमारत दुर्घटनेत अविरतपणे चालविली २६ तास पोकलॅण्ड
किशोर लोखंडे या नायकास महाराष्ट्र २४ आवाजचा सलाम!
चार वर्षीय मुलाला ढिगा-याखालून काढण्यात बचावपथकाला आले यश
महाराष्ट्र २४ आवाज
महाड : नजीर पठाण
महाड येथील तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना गती येण्यासाठी माणुसकीला महत्व देत अविरतपणे २६ तास पोकलॅण्ड चालवीत, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याचा किशोर लोखंडे (मो.९३७०६३५१६३ / ९४२२३९४४४०) या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले आहे.
आपल्या सर्वांकडून जीवनातल्या या खऱ्या नायकाला सॅल्यूट...! तसेच चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी याला ढिगा-याखालून सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे.
बचाव पथकही शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे ग्रामीण रूग्णालय, महाड येथे जाऊन त्यांनी या मुलाची व त्याच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली.