माणगांव आगाराला तळा विभागात लागलीय लाॅकडाऊनची झळ अजूनही बस सुरू नाही, मागणी असूनही प्रशासशनाकडून दूर्लक्ष तळा- इंदापूर- तळा एस् टी. शटल सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

माणगांव आगाराला तळा विभागात लागलीय लाॅकडाऊनची झळ


 अजूनही बस सुरू नाही, मागणी असूनही प्रशासशनाकडून दूर्लक्ष


तळा- इंदापूर- तळा एस् टी. शटल सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी


महाराष्ट्र २४ आवाज



तळा (किशोर पितळे) संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रवासी वाहतुकीला महामंडळ व खाजगी वाहतूक व्यवस्थेला बंदी घालण्यात आली होती. तब्बल पाच महिन्यात कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले असून प्रवासी वाहतूकीला जिल्हाबंदी शिथिल करून जिल्हा बाहेर देखील परवानगी देण्यात आली असताना मात्र माणगांव आगाराला तळा पॅकेट मध्ये लाॅकडाऊन लागला आहे. प्रवाशांची मागणी असूनही शेड्युल सुरू केलेले नाहीत तसेच तळा इंदापूर एसटी शटल सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. तळा इंदापूर एसटीची शटल सेवा काही महिन्यांपूर्वी चालू होती तिला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे  मात्र ही शटल सेवा बंद असल्याने सणासुदीच्या काळात अजूनही बंद असल्याने याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक प्रवासी इंदापूर, माणगावला आपल्या कामांसाठी ये जा करीत असतात. तळा तालुका उत्पन्न देणारा चांगले पॅकेट आहे राष्ट्रीय महामार्गापासून १५ कि.मी.अंतर असल्याने डोंगराळ दुर्गम तालूका असून ६५ गावांचा तालुका आहे. एस् टी.हे एकमेव दळण वळणाचे साधन आहे. तालुका ठिकाणी अनेक जण शासकीय कामासाठी शहराकडून येत असतात शटल सेवा सुरू असताना या सर्वांना प्रवास करणे सोयीस्कर पडत होते. मात्र ही सेवा बंद झाल्याने तसेच वेळेवर इंदापूर साठी एस टी नसल्याने या सर्वांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी खाजगी वाहनांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. व वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतआहे. याबाबत राष्ट्रवादी तथा सामाजिक कार्यकर्ते ईस्माईल भाई पल्लवकर यांनी माणगांव आगाराकडे मागणी केली आहे. तरी रायगड विभाग नियंत्रक पेण यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून प्रवाश्यांची होणारी गैरसोय दूर करावी व पूर्वी प्रमाणे चालू असलेली सर्व शेड्युल चालू करण्याची मागणी प्रवासीं वर्गाकडून केली जात आहे. 


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image