स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या हस्ते तळा पत्रकार संघ सन्मानित.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) कोरोना काळात सुरुवातीपासून आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेपर्यंत प्रत्येक घडामोडी पोहचविणाऱ्या तळा तालुका पत्रकार संघाला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने तळा पत्रकार संघाने उत्तम कर्तव्य बजावून कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या कडून तळा तालुका पत्रकार संघाला पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी तळा तालुका पत्रकार संघ अध्यक्ष संजय रिकामे,सल्लागार पुरुषोत्तम मुळे, संध्या पिंगळे उपस्थित होते.