खंडीत वीज पुरवठा व वाढीव बिले संदर्भात स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे वतीने निवेदन

खंडीत वीज पुरवठा व वाढीव बिले संदर्भात स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे वतीने निवेदन


महाराष्ट्र २४ आवाज



तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यात ३ जुलै पासून विजपुरवठा निसर्ग वादळाने खंडित झाला असून ट्रान्सफार्मर, पोल यांची पडझड झाली आहे पण त्याला जवळपास दोन महिने लोटले तरी अद्यापही विजपुरवठा सुरळीत झाला नाही. विज नाही मात्र विजेची बिले वाढीव आली आहेत. यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड यांचे वतीने मुख्य कार्यकारी अभियंता श्री खांडेकर यांना निवेदन देण्यात आले.



     यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे सरचिटणीस सुनील चाचले, स्वराज्य प्रतिष्ठान रायगड जिल्हा उपप्रमुख शिक्षण समिती संकेत नाकरेकर, तळा तालुका संघटक


देवानंद शिगवण, सदस्य प्रशांत काप, अतिष खंडागळे, स्वप्निल बैकर, सचिन पालकर, रमेश चव्हाण, महादेव बटावले, रुपेश बटावले, नितेश बटावले, वैभव बोर्ले, सुरेश चोरगे, ओंकार घाडगे, चंदु लोखंडे, स्वप्निल काप, राहुल काप, मनिष घागरुम, विनायक जगताप, आदि सदस्य उपस्थित होते.



       यावेळी संकेत नाकरेकर यांनी स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे वतीने मागणी केली आहे की येत्या दहा दिवसांत तालुक्यातील गावांचा विज पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही स्वराज्य प्रतिष्ठानचे वतीने तीव्र आंदोलन उभे करू. त्याचबरोबर लाईट बंद असतानाही ग्राहकांना भरमसाठ बिले आली ती सुद्धा त्वरीत कमी करून मिळावी .अशी कडक शब्दात मागणी केली आहे. ती न झाल्यास स्वराज्य प्रतिष्ठान रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही. अशी मागणी तळा कार्यालयातील मुख्य कार्यकारी अभियंता श्री खांडेकर यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image