प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुंबई गोवा महामार्गावर झळकले बॅनर
महाराष्ट्र २४ आवाज
माणगाव (प्रसाद गोरेगावकर) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, रायगड जिल्हा माणगाव शाखेच्या वतीने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर माणगाव, गोरेगाव व लोणेरे येथे गणेशोत्सव व मोहरमच्या शुभेच्छा देणारे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बॅनर झळकत असून गणेशोत्सवासाठी कोकणात येणा-या भक्तांचे लक्ष वेधून घेण्याचे काम या बॅनरने केले आहे.
यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गोरेगावकर, माणगाव तालुका अध्यक्ष रिजवान मुकादम(पाटील), कार्याध्यक्ष अशोक कासे, महिलाध्यक्ष स्वप्ना कांबळे, उपाध्यक्ष पांडूरंग माने, सचिव रूपेश रातवडकर, सहसचिव मंगेश मेस्त्री, खजिनदार सिकंदर आंबोणकर, सहखजिनदार राकेश गोरेगावकर, संघटनेचे सदस्य नाझी टोळ, रूपेश लहाने, शरद सकपाळ, राम भोस्तेकर, माने आदी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी टी., कोकण अध्यक्ष किरण बाथम, कोकण कार्याध्यक्ष समीर बामुगडे,कोकण संघटक संजय लांडगे, कोकण सचिव महेश महाजन, कोकण सरचिटणीस पंडीत फंगाळ, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे , रायगड जिल्हाध्यक्ष अॅड.रत्नाकर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष जयप्रकाश पवार,जिल्हा महिलाध्यक्षा दिपीकाताई चिपळूणकर, जिल्हा संघटक हरिश्चंद्र महाडिक,जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, जिल्हा सचिव आविष्कार देसाई, जिल्हा उपाध्यक्ष गणेश मते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य पदाधिकारी , विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सभासदांनी माणगाव टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.