डी.जी.टी. तळा महाविद्यालयाचे प्रा. दत्ता कुंटेवाड यांना डाॅक्टरेट पदवी प्रदान
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- सुरेंद्र शेलार
तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा रायगड येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.दत्ता उत्तमराव कुंटेवाड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मानव्य विद्याशाखेच्या वतीने अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट हि पदवी नूकतीच बहाल करण्यात आली. "कोकणातील पर्यटण व्यवसायाचा सामाजिक व आर्थिक अभ्यास" या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री.पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री.मंगेश देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन डॉ.श्रीनिवास वेदक शाळा समितीचे चेअरमन श्री.महेंद्र कजबजे, ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन श्री.श्रीराम कजबजे प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री.किरणशेठ देशमुख सदस्य डॉ.सतिश वडके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास निंबाळकर तसेच सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने तसेच विद्यार्थी व सर्व शैक्षणिक सामाजिक स्तरातून अभिनंदन होत आहे.