तळा तालुक्यातील अरुण खुळपे सर यांचा आय.आय.टी.मुंबई एस.सी.ई.आर.टी. कडुन गणित विषयाकरीता राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर पदवी देऊन सन्मान
महाराष्ट्र २४ आवाज
तळा (किशोर पितळे) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण SCERT पुणे IIT मुंबई आणि राष्ट्रीय शिक्षा अभियान यांचेकडुन क्वॉलिटी इंप्रुव्हमेंट इन मॕथेमॕटीक्स एज्युकेशन प्रकल्पाकरीता महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातुन निवड चाचणीद्वारे मुंबईच्या अग्रगन्य आय.आय.टी.या संस्थेच्या प्रा.इंद्रकुमार राणा सर यांच्या टीम मार्फत गणित विषयातील साहित्यनिर्मिती, अध्ययन पध्दत, जिओजेब्रा वापर, व्हिडिओ निर्मिती व संशोधन इ.चा समावेश असलेले हे प्रशिक्षण 2018 पासुन सिंहगड इन्सिस्टिट्यूट लोणावळा येथे तीन टप्यात पार पडले
प्रशिणाच्या शेवटी परीक्षा अंती राज्यातील 323 पैकी 246 प्रशिक्षणार्थीना राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर ही पदवी IIT मुंबई यांचेकडून देण्यात आली त्यामध्ये रायगड जिल्ह्यातून तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अशोक ल.लोखंडे विद्यामंदिर पिटसई ता.तळा येथिल गणित शिक्षक श्री.अरुण शिवाजी खुळपे सर यांची निवड झाली आहे याकरीता त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.