तळा महावितरण कंपनी विरोधात विराज टिळक यांच्या उपोषणाला नागरिकही देणार पाठिंबा तळा प्रेस क्लबचा पाठिंबा जाहिर

तळा महावितरण कंपनी विरोधात विराज टिळक यांच्या उपोषणाला नागरिकही देणार पाठिंबा


तळा प्रेस क्लबचा पाठिंबा जाहिर


महाराष्ट्र २४ आवाज



तळा (किशोर पितळे) तळा हे शहर तालुक्याचे ठिकाण असून संपूर्ण जगामध्ये कोरोनाने हाहाकार उडालेला असताना त्याचा प्रादुर्भाव तळा तालुक्यालाही झाला. त्यातच केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने लॉकडाऊन करून नागरिकांच्या उपजिविकेचे साधन खेचून घेवून त्यांच्या पोटाला चिमटा लावला. त्यामुळे क्रोधलेले नागरिक तशाही परिस्थितीत दिवस काढत असताना निसर्ग वादळाने होत्याचे नव्हते केले. अशा परिस्थितीत नागरिकांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना निसर्ग वादळामुळे पडलेली घरे पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न करीत असताना नागरिकांनी मेहनतीने महावितरण कंपनीला विज पोल उभे करण्यास मदत केली. तारा ओढल्या, खड्डे खोदले तरी देखील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. विद्युत प्रवाह देखील अकार्यक्षम असलेल्या रायगड जिल्ह्यातील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांमुळे आजही सुरळीत झालेला नाही. उर्जा खात्याचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या विरोधात तळा तालुक्यातील एक युवक व्यावसायिक तथा ए. एम् चॅनलचे रिपोर्टर (पत्रकार) विराज टीळक विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारा विरोधात लवकरच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी तळा तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. तळा शहरात गेले 3 दिवसापासून विद्युत प्रवाह खंडीत झालेला आहे. अनेक वर्षापासून तळा शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यातच निसर्ग वादळामुळे पडलेले पोल दोन महिने होवून देखील उभे राहू शकले नसल्यामुळे दोन महिन्यापासून तळा शहरातील नागरिक अंधारात दिवस काढत आहेत. या विरोधात तळा शहरातील एक ज्येष्ठ नागरिक न्यायालयात जाण्याच्या तयारीत असतानाच तळा शहरातील एक उद्योजक तरुण विराज टिळक यांनी तळा तहसीलदारांना पत्र देवून आजपासून ४ दिवसात विद्युत पुरवठा कदापि खंडीत न होण्याच्या शब्दावर विद्युत वितरण कंपनीने आपल्याला सांगितले नाही तर आपण आमरण उपोषण करणार आहोत या उपोषणाला रायगड प्रेस सल्लंग्न तळा मराठी पत्रकार संघ पाठिंबा देणार आहे. तालुका होऊन वीस वर्षाचा काळ लोटला असून अजूनही विकासासाठी बोंब मारावी लागत आहे.


 गेल्या दोन महिन्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. जीवन मेटाकुटीला आले आहे. कोरोनामुळे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत त्यात महावितरणच्या विजेचा खेळ खंडोबा, वीजेवर अवलंबून असणारे उद्योग बंद पडले आहेत. पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे महीला वर्ग संताप व्यक्त करीत आहेत आता मात्र सहनशीलतेचा अंत झाला आहे. विजेच्या गंभीर समस्याने नागरिक ग्रासले आहेत. अशी परिस्थिती उद्भवण्यास कारण रायगड जिल्ह्याचे विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता पाटील, यांचे कर्मचाऱ्यावर वचक राहीलेला नाही. तळा विभागाचे कार्यकारी अभियंता पानसरे आणि तळा शहराचे उपकार्यकारी अभियंता मानवटकर हे जबाबदार आहेत. त्यामुळे जर ही परिस्थिती बदलली गेली नाही आणि विराज टिळक या तरुणाला उपोषण करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत होत आहेच नागरीक रस्त्यावर उतरून महावितरणच्या अकार्यक्षम कारभाराचे धिंडवडे काढुन व उपोषणाला पाठिंबा देऊन प्रतिसाद देणार आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाने देखील पाठिंबा जाहिर केला आहे याबाबत जिल्हाधिकारी, पालकमंत्री ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत काय निर्णय घेतात.याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image