जळकोट कोविड सेंटर मधील प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस

जळकोट कोविड सेंटर मधील प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस


महाराष्ट्र २४ आवाज



प्रतिनिधी- ओमकार टाले


जळकोट : गेल्या काही दिवसात जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. म्हणुन जळकोट येथे कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर बनवण्यात आले आहे.पण आज या कोविड सेंटर मधील प्रशासनाचा गलथान कारभार कोविड रुग्ण असलेल्या निवेदिता देवशेट्टे यांनी उघडकीस आणलेला आहे.या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना कसल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत.४८ तास उलटुन गेले तरीही कुणीही चेकअप साठी येत नाहीत.कोविड सेंटर मध्ये शुगर,बीपी चे आजार असलेले रुग्ण सुद्धा आहेत. त्या रुग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे असताना.त्यांची कोणतीही काळजी घेतली जात नाही.या रुग्णांना जेवण सुध्दा वेळेवर दिले जात नाही दुपारी ४ च्या सुमारास अनेक वेळा जेवणाची मागणी केल्यानंतर जेवण दिले जाते. कोविड सेंटर मध्ये केवळ ३ स्वच्छतागृह आहेत पण त्यांची अजिबात स्वच्छता नाही. स्त्रियांसाठी वेगळ्या स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही. आमची खाजगी दवाखान्यात उपचार घेण्याची परिस्थिती असताना ही केवळ आम्ही शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेऊन सर्वजण इथे दाखल झालो पण इथे रुग्णांची आजारातून मुक्तता करण्याऐवजी त्यांना मृत्यूच्या तोंडात ढकलले जात आहे.



आमचा जळकोट तालुका हा मागास आहे. इथल्या गोरगरीब जनतेला शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहिल्याशिवाय पर्याय नाही पण प्रशासकीय यंत्रणा इथे कुठेही काम करताना दिसत नाही.कोविड रुग्ण डॉ.निवेदिता देवशेट्टे यांनी हा सर्व प्रकार जळकोट तहसीलदार यांच्या निदर्शनास आणुन दिले असता.जळकोट तहसीलदार यांनी रुग्ण डॉ. निवेदिता देवशेट्टे यांना वैयक्तिक बोला असे सांगितले.पण सर्वसामान्य व्यक्तीच काय ? त्यांचे हाल कधी थांबनार ?त्यांची व्यवस्था कोण करणार ? असे प्रश्न त्यांना विचारले असता त्यांनी विनाकारण आमच्याशी वाद घालु नका असे बेजबाबदार पणाचे उत्तर जळकोट तहसीलदार यांनी रुग्ण डॉ.निवेदिता देवशेट्टे यांना दिल्याचे रुग्ण डॉ.निवेदिता यांनी सांगितले.रुग्णांना धीर देण्याऐवजी जळकोट तहसीलदार असे उद्धट वागत असतील तर रुग्णाचे हाल काय होतील ? आम्हाला कोविड सेंटर मधील सुविधांविषयी तहसीलदार यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. 


म्हणुन डॉ. निवेदिता देवशेट्टे यांनी लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख, राज्यमंत्री संजयजी बनसोडे,जिल्हाधिकारी जी श्रीकांत सर यांनी जळकोट तालुक्यावर जातीने लक्ष घालून आवश्यक असे सुविधापूर्ण कोविड सेंटर द्यावे व इथल्या रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी विनंती केली आहे..


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image