अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. डोंगरे
अंजनगाव तालुक्यात आनंदाची लहर
अनेकांनी बातमी समझताच दिल्या शुभेच्छा
ग्रामीण रुग्णालयात आता उंटावरून शेळ्या हाकलने बंद
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव शहरातील बहुचर्चित ग्रामीण रुग्णालय नेहमी वादग्रस्त होते. कारण रुग्णालयात वैधकीय अधीक्षक म्हणून नाममात्र असणारे पद स्थानिक ठिकाणी कार्यरत नसल्याने बहुतांश वाद निर्माण होत होता. मात्र अंजनगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे यांना आता ग्रामीण रुग्णालयात वैधकीय अधीक्षक म्हणून रीतसर पत्र मिळाल्या मुळे आता खऱ्याअर्थी ग्रामीण रुग्णालयात सुधारणा होणार असल्याचे बोलल्या जात आहे. सदर ग्रामीण रुग्णालयाचा चार्ज जिल्हाशल्य चिकित्सक निकम साहेब ह्यांनी डॉ. डोंगरे साहेब ह्यांना दिल्या बद्दल प्रेस सपाचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन हुरपडे यांनी त्यांचे आभार मानले. त्यात अंजनगाव तालुक्यातील कापूसतळणी पी. एच. सी. चा देखील अधिभार त्यांचे कडे असल्याचे समजते.
अंजनगाव तालुक्यातील आरोग्याच्या योग्य व्यवस्थापनसाठी सतत धडपड करणाऱ्या डॉक्टर सुधीर कुमार डोंगरे यांच्या कार्या बद्दल तालुक्यातील प्रत्येक नागरिक चांगलेच परिचित आहेत. प्रत्येकाला सामोपचाराने मार्गदर्शन करणाऱ्या व सामान्य नागरिकांशी संपर्कात असणाऱ्या डॉ. डोंगरे यांचे ग्रामीण रुग्णालय वैधकीय अधीक्षक पदी नियुक्ती बद्दल सर्वत्र स्वागत होत आहे. ज्यामुळे संपूर्ण अंजनगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*************************************
आता ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापन सुदृढ होणार..
डॉ. डोंगरे अंजनगाव शहरात वास्तव्य करीत असल्यामुळे २४ तास सेवा ग्रामीण रुग्णालयास मिळणार आहे. ज्यामुळे कर्मचारी व प्रशासनास योग्य मार्गदर्शन मीळेल. त्याच प्रमाणे आरोग्य सेवेत त्यांचे उत्कृष्ट कामगिरी बद्दल तालुक्यातील नागरिक आनंदी असल्यामुळे नागरिकांना त्यांचेवर विस्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..
कृष्णा गोमासे
नगरसेवक व शिक्षण सभापती
नगर परिषद अंजनगाव सुर्जी
***********************************
ग्रामीण रुग्णालयांची दुर्दशा सुधारणार.....
अंजनगाव ग्रामीण रुग्णालयास योग्य वैद्यकीय अधीक्षक दिल्या बद्दल जिल्हाशल्य चिकित्सक श्री निकम यांचे आभार मानले. कित्तेक वर्षा नंतर अंजनगाव शहरात रहिवासी असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक झाली. त्यामुळे अंजनगाव ग्रामीण रुग्णालयाचे योग्य व्यवस्थापन निश्चित होणार असल्याचे शुभ संकेत दीसत आहेत. डॉ डोंगरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
गजानन हुरपडे
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र
जिल्हा कार्याध्यक्ष अमरावती