महावितरण कंपनीने पन्नास टक्के वीज बिल माफ करावे - कुणबी युवा मंच
महाराष्ट्र २४ आवाज
गोरेगाव (प्रसाद गोरेगावकर) संपूर्ण जगात सध्या थैमान घातलेल्या कोरोनारुपी रोगामुळे जनसामान्यांचा जीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते. प्रत्येक जण आपली नोकरी, व्यवसाय सोडून आपलं जिव वाचवण्यासाठी घरातच बसून होता. कमाईचं साधन हरवून बसला आणि विस्कळित झालेली घडी सावरते ना सावरते तोच रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घालत लोकांचं आतोनात नुकसान केलं. जनसामान्य कसा सावरणार? कसा स्वत:चा संसार उभा करणार? या सर्वांचा विचार चालू असतानाच अशा परिस्थितीत महावितरणाने लोकांना भरमसाठ अवाजवी बिलं पाठविली आहेत आधीच कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या पाठ मोडली त्यातच या भरमसाठ आलेल्या बिलांमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला एक मोठ्या संकटात टाकण्याचं काम केले आहे, या बाबतीत जनतेमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे, या गोष्टीकडे कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा स्थनिक पुढाऱ्यांचे लक्ष नाही. आता पुढारी गप्प का??? अशी चर्चा जनसामान्यांतून ऐकायला मिळत आहे. सामान्य जनतेला जर न्याय मिळत नसेल तर उपयोग काय अशी जनता प्रश्न विचारताना दिसत आहे. सामान्य जनतेला आता कोण वालीच उरला नाही. याचाच एक भाग म्हणून कुणबी युवा मंच लोणेरे गोरेगाव विभाग सामन्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा ठेवून नागरीकांना न्याय मिळवून देणार असून संघटनेने आता जनतेसाठी लढण्याची भूमिका घेतली आहे.
वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका कुणबी युवा मंचाची आसल्याची बोलून दाखविले आहे. या संदर्भातील पहिलं पाऊल म्हणून कुणबी युवा मंचाच्या शिष्टमंडळाने एक निवेदन महावितरण कंपनीच्या गोरेगाव कार्यालयाला दिले आहे आणि हि बाब खासदार,रायगड पालकमंञी,स्थानिक आमदार यांच्या निदर्शनास आणून देऊ. या संदर्भात जनतेच्या हिताचे महावितरणने वीजबिलात 50% सुट द्यावी व सणासुदीत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयी योग्य दखल न घेतल्यास लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोणेरे गोरेगाव कुणबी युवा मंचाच्या वतीने देण्यात आला आहे अशी माहिती संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रतिनिधीनां दिली.