पिपळधरा ग्रामपंचायतला वृक्ष भेट देऊन वृक्ष लागवड पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपुरचा उपक्रम

पिपळधरा ग्रामपंचायतला वृक्ष भेट देऊन वृक्ष लागवड


पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपुरचा उपक्रम


महाराष्ट्र २४ आवाज


उपसंपादक- संजीव भांबोरे


भंडारा : स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने 15/08/2020 ला पिपळधरा ग्रामपंचायत व जि.प.उच्च प्रा.शाळा येथे 74वा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय साधनाताई सडमाके तर पिपळधरा ग्रामपंचायत येथे सरपंच नलिनी शेरकुरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.



कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायच्या सदस्य आदरणीय मा. सुरेंद्र नागोसे, माजि सरपंच निलकंठ सडमाके, आंगनवाडी सेविका सौ.मंगला उईके,मदतनिस मालुबाई येरगुडे आशा मनिषा नागोसे उपस्थित होते. या प्रसंगी पिपळधरा ग्रामपंचायत अंतर्गत शाळा जि.प ला पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ नागपुर कडुन ग्रामिण कृषिकार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत फळाचे वृक्ष भेट देऊन वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थि कु.दिप्ती सुरेश झाडे,कु.पायल काडे,कु.सुप्रिया मेश्राम यांनि सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. ग्रामसेवक गजानन चिव्हाणे,आशा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.पुरूषोत्तम शेरकूरे साहेब उपस्थित होते.



आज संपूर्ण विश्व कोविड पॅण्डिमिक ने त्रस्त आहे.अशा वेळी प्रत्येकांनी आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावणे, सॅनेटाईजर चा वापर करने,सोशल डिस्टंन्सचे पालन करते अनिवार्य आहे.याचेच सामाजिक जाणं व भान ठेवून झेंडावंदन नंतर कोरोनामुक्त भारत कसा होईल यासाठी शपथ घेण्यात आली़.या कार्यक्रमला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना पोद्दार मॅम,सौ.संगिता पीसे मॅम,मा.विलास दडमल सर,ग्रामपंचारत कर्मचारी सेवक ऊईके,गजु धुर्वे ,रोशन घोंगडे,हेमाताई सेविका उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा सुरेश झाडे सर व आभार पोद्दार मँम यांनी केले.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image