अहमदपूरमध्ये जनावराच्या दवाखान्यात डॉक्टरचा तुटवडा
महाराष्ट्र २४ आवाज
अहमदपूर(महादेव महाजन) अहमदपूरच्या पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये जवळपास पंधरा दिवसापासून डॉक्टरचा तुटवडा आहे दोन ते तीन महिन्याच्या काळामध्ये दवाखान्यात डॉक्टर आहे की नाही याबाबत शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे. कारण अहमदपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ज्यावेळी जाल त्यावेळी पठाण नावाचा एक परिवेक्षक दिसून येतो डॉक्टर मात्र कधीच दिसत नाही आणि या कारणामुळे काल मरशिवणी येथील शेतकऱ्याच्या गाईचे गर्भपात झाला आहे याला कारण म्हणजे पर्यवेक्षकांनी केलेली चुकीची ट्रीटमेंट दिली आहे याला जिम्मेदार कोण असा सवाल शेतकरी वर्ग मधून होत आहे तसेच येथे होत असलेल्या ट्रीटमेंट ही ही फ्री स्वरूपात होत नसून येथे कधी 200 कधी 300 कधी 100 तर कधी पन्नास रुपये आकारले जातात व येथील जनावरांना दिले जाणारी मेडिकल ही पण बाहेरून आणावी लागत आहेत याकडे कुणाचं लक्ष नाही का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला असून यावर काही ॲक्शन कोणी घेईल का याकडे लक्ष सर्वांचे लागले आहे.