पत्रकार डी.टी. आंबेगावे यांच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग

पत्रकार डी.टी. आंबेगावे यांच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


सुमठाणा, लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुमठाणा हे छोटंस गाव.गेल्या आठ- दहा दिवसापासून गावात चिकनगुणीया या रोगाने थैमान घातले असून प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देऊन गावक-यांना शांत करीत होते ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांना समजताच प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून काही तासामध्ये सुमठाणा गावात प्रशासनाकडून जंतूनाशक फवारणी व पाण्यात जंतूनाशक औषध टाकून सर्वे करण्यात आल्याने गावक-यांनी समाधान व्यक्त केले.



एका बाजूला देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असतांनाच या गावात चिकणगुणीया या रोगाने नागरिक त्रस्त असून प्रशासनाने दुर्लक्ष करणे किती गंभीर बाब आहे ही चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावासाठी जर वेळकाढूपणा करीत असेल तर गावक-यांनी जायचं कुठं असा प्रश्नही निर्माण झालेला आहे. पत्रकार डी.टी. आंबेगावे यांच्या तक्रारीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यामुळे गावत साथरोगाचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता आहे. यापुढे सुमठाणा गावातील समस्यासंदर्भात प्रशासनाने असा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी सांगितले आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image