अनंत (बाळशेठ) लोखंडे यांचे दु:खद निधन तळा तालुक्यातील राजकीय चाणक्य हरपला

अनंत (बाळशेठ) लोखंडे यांचे दु:खद निधन


तळा तालुक्यातील राजकीय चाणक्य हरपला


महाराष्ट्र २४ आवाज



(तळा श्रीकांत नांदगावकर) श्रीवर्धन मतदारसंघाचे शिवसेना सल्लागार अनंत वसंत उर्फ बाळशेठ लोखंडे यांचे शनिवार दि.१९ रोजी वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. तळा तालुक्यातील राजकीय चाणक्य म्हणून त्यांची ओळख होती. सक्षम विचारसरणी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व,एक कणखर नेतृत्व म्हणूनही ते परिचित होते. बाळशेठ यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढ उतार पाहिले मात्र कोणत्याही पदासाठी त्यांनी कधीही लाचारी पत्करली नाही. श्रीवर्धन मतदारसंघाचे सल्लागार तसेच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. स्पष्टवक्तेपणा आणि मनमिळाऊ स्वभाव तसेच आपल्या सामान्य कार्यकर्त्याच्याही अडीअडचणीला धावून जात असल्यामुळे तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण श्रीवर्धन मतदारसंघात शोककळा पसरली. तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने त्वरित बंद केली. तसेच अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून आणि एक मुलगी असा परिवार आहे. 


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image