शेतकऱ्याकडून फक्त पिक विमा भरल्याची पावती घेवुन, नुकसान भरपाई मागणी अर्ज तलाठी यांच्यामार्फत शासनानेच भरून घ्यावा- ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केली मागणी

शेतकऱ्याकडून फक्त पिक विमा भरल्याची पावती घेवुन, नुकसान भरपाई मागणी अर्ज तलाठी यांच्यामार्फत शासनानेच भरून घ्यावा


- ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केली मागणी


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


लातुर : दि. २७ - लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे. याबाबत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. नुकसानीची भरपाई मिळणेसाठी वैयक्तिक पंचनामे होणे अत्यंत आवश्यक आहे. पंचनामा करण्याकरिता शेतकऱ्यांचा ७/१२, आधार कार्ड, बँक पासबुक, नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे फोटो, इत्यादी कागदपत्रे सादर करावीत असे सांगितले जात आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतातील कामधंदे सोडून विनाकारण कागदपत्रांसाठी फिरवण्यापेक्षा मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्यामार्फत शासनाने अर्जपुरवठा करून केवळ शेतकऱ्याकडून विमा भरल्याची पावती घ्यावी. आणि अर्जावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी. शेतकऱ्यांना आवश्यक नसताना अन्य कागदपत्र मागण्याची गरज नाही. तेव्हा जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांनी तलाठी यांच्यामार्फत अर्ज भरून घ्यावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्याकडे केली आहे. 


जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी फक्त विमा भरलेली पावती आणि अर्ज हे दोनच कागदपत्रे घ्यायला लावावेत. शेतकऱ्यांना अनावश्‍यक धावपळ करण्यास भाग पाडू नये. अशी विनंती प्रशासनाकडे व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image