तळा तालुक्यात कोरोनाची मुसंडी रुग्णांचा आकडा ५९ वर.

तळा तालुक्यात कोरोनाची मुसंडी 


रुग्णांचा आकडा ५९ वर.


महाराष्ट्र २४ आवाज



तळा (किशोरपितळे) देश आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत आहे देशातील काही ठिकाणी कोरोना रुग्ण कमी होताना दिसत होते असेच काहीसं रायगड जिल्यातील तळा तालुक्यामध्ये झालं आहे खूप दिवस कोरोना रुग्ण सापडले नसल्याने तळा वासियाचे कुठे तरी काळजीचे कारण कमी झाले होते परंतु पुन्हा दिवसें दिवस कोरोना रुग्ण सापडत असल्याने तळा वासीयांच्या चिंतेत आता भर पडली आहे.दिवसागणीत शहरात व ग्रामीण भागात देखील वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार तळा शहरात ४ तर तालुक्यातील पिटसई व तारास्ते येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आले आहेत.


आता पर्यंत तळा तालुक्यात ५९ रुग्ण आढळून आले त्यातले ३८ बरे होऊन घरी गेले ३ मयत तर सध्या १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनावर ईच्छा शक्ती व प्रतिकार शक्तीच्या बळावर ३८ रूग्ण कोरोनावर मात करून सुखरूप घरी आले आहेत ही दिलासा देणारी बाब असली तरी पुर्णपणे साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.राज्यात आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी हळूहळू काही कंपन्या,एस् टी बस,खाजगी वाहने, मिनिडोअर,रिक्षा प्रवासी वाहतूकीला परवानगी दिली असून संक्रमण रोखण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे व्यापारी, बँका, किरकोळ दुकानदार, ग्राहक यांनी काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे तहसील प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image