पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाख रूपयांची मदत द्यावी

पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी 


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी


 पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाख रूपयांची मदत द्यावी 


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


मुंबई : रायगड जिल्ह्यातील माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी तसेच त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची तात्काळ मदत करावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार संतोष पवार यांना कर्जतवरून नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील रूग्णालयात अॅम्ब्युलन्समधून घेऊन जात असतांना रस्त्यातच सिलेंडरमधील आॅक्सिजन संपल्यांने कर्मचा-यांना दुसरा सिलेंडर योग्य प्रकारे लावता न आल्याने संतोष पवार यांना जीव गमवावा लागला आहे. शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे संतोष पवार यांचा मृत्यू झाल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी, पुणेचे पत्रकार पांडूरंग रायकर यांच्यासह संतोष पवार यांचा मृत्यू होणं दु:खदायक असल्याची भावना पत्रकारांमध्ये दिसून येत आहे. राज्यामध्ये काही पत्रकारांवर अद्याप उपचार सुरू असून दिवसेंदिवस बाधित पत्रकारांच्या संख्येत वाढ होत असल्यांने सरकारने बाधित पत्रकारांच्या उपचाराची विशेष व्यवस्था करावी. कोरोनामुळे मृत पावलेले पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना मा.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केल्याप्रमाणे 50 लाख रूपयांची मदत द्यावी. यापुढे दुसरा गंगाधर सोमवंशी, पांडूरंग रायकर आणि संतोष पवार निर्माण होणार नाही याची जबाबदारी आपल्या आरोग्य विभागाने घ्यावी अशीही मागणी निवेदणात करण्यात आली आहे.


या निवेदनावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, राज्य महिलाध्यक्षा सुजाता गुरव, राज्य महिला कार्याध्यक्षा सविता कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image