रायगडचे खा. सुनील तटकरे यांचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र

रायगडचे खा. सुनील तटकरे यांचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र...


महाराष्ट्र २४ आवाज



‌ रायगड(नितीन लोखंडे)रायगड जिल्ह्यातून जाणा ऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. NH ६६ या ८५. किमी रस्त्यापैकी पंधरा ते वीस किमी रत्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम कधी पुर्ण होणार या प्रतिक्षेत प्रवाशी आहेत. गेली कित्येक वर्षे मुंबई - गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. महामार्गाच्या चौपदरीकणाच्या रखडलेल्या कामामुळे आजूबाजूच्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऐंशी पंच्याऐंशी कि. मी असलेल्या एक तासाच्या प्रवासाला दिड ते दोन तास प्रवास करावा लागतो. जागोजागी खोदकाम, रत्यामधे मातीचे ढिगारे, जिथे - तिथे मोऱ्यांचे खोदकाम , रत्याच्या आजूबाजूला शेतामध्ये टाकलेले लोखंडी साहित्य , खडी, माती यामुळे शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या मार्गावरून प्रवास करताना रस्त्यामधे खड्डा की खड्यामधे रस्ता हा सर्व सामान्य नागरीकांसमोर मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस या महामार्गावर अपघात होऊन नागरीकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अशा अनेक प्रश्नावर मोर्चे , आंदोलने केली पण प्रशासनाने या सर्व प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी गंभीर दखल घेत पळस्पे (पनवेल ) ते इंदापुर या पहिल्या टप्यातील राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येणाऱ्या ८५. किमी रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे करण्यात केली आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे रायगड - रत्नागिरीच्या विकासाबाबत संसदेमध्ये आवाज उठवून विकासकामे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image