महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच होणार सुरू.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरी.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) तळा तालुक्यातील महागाव विभाग हा दुर्गम, डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो.आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी २०१९ मध्ये आरोग्य केंद्र उभारण्यात आले.मात्र अद्यापही या आरोग्य केंद्राचे उद्घाटन न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी तळा व माणगाव सारख्या शहराच्या ठिकाणी जावे लागत होते.तीन वर्षांपूर्वी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी २४ कोटी ६३ लाख १ हजार ९९९ रुपये खर्चाची मंजुरी मिळाली.तद्नंतर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन रखडले होते.मात्र पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली असता त्यांनी स्वतः लक्ष देऊन हे काम मार्गी लावले.महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच सुरू होणार असल्याने महागावसह बारपे, बहुलेवाडी, महागाव आदिवासीवाडी,महुरे,निगुडशेत,निगुडशेत आदिवासी वाडी,साळशेत, विनवली, फळशेत, कर्नाळा,म्हसाडी,वाशी, कोरखंडे, पढवण, कोणथरे,आदी गावांतील ग्रामस्थांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे तसेच स्थानिक पातळीवरतीच उपचार होऊन होणारा प्रवासाचा त्रास कमी होईल. उशिरा का होईना पण महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार असल्याने येथील गरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रतिक्रिया
महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुरू करण्यात आली नव्हती मात्र पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली असता त्यांनी स्वतः यात लक्ष देऊन प्रा.आ. केंद्र सुरू करण्याचे काम मार्गी लावले.
(सचिन कदम पोलीस पाटील महागाव)
महागाव प्रा.आ.केंद्र सुरू होणार असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीने होणारे नुकसान नक्कीच थांबणार आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आजारपणात शहराच्या ठिकाणी जावे लागत होते परंतु आता त्यांच्यावर स्थानिक पातळीवरच उपचार होऊन इतर ठिकाणी करावा लागणारा प्रवास थांबणार आहे.
(अक्षरा कदम मा.सभापती तळा)