राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन
सर्वात मोठी बातमी
महाराष्ट्र २४ आवाज
जळकोट(ओमकार टाले)
महाराजांचे वय एकशे चार वर्षांचे होते त्यांचे भक्तगण महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या राज्यात आहेत यांच्या निधनाने अध्यात्मिक पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे
संपूर्ण देशभरात डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे अहमदपूरकर महाराज म्हणून प्रसिद्ध होते तर अनुयायी त्यांना अप्पा म्हणत असत या वयामध्येहि त्यांच्यातील ऊर्जा आणि तत्परता अनुयायांना प्रेरणा देणारी होती ते शेवटपर्यंत कार्यरत होते एमबीबीएसची वैद्यकीय पदवी घेतलेल्या महाराजांचा अध्यात्माकडे कर होता संसारीक सुखापासून अलिप्त राहून समाजाला दिशा देण्याचे काम केले अध्यात्मिक आणि विज्ञान निष्ठ संत अशी महारांची ओळख होती अमदपुर येथे त्यांनी भक्ती स्थळाची स्थापना केली आहे काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे अहमदपूर होऊन नांदेडच्या काब्दे ग्णालयात दाखल करण्यात आले होते . उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले अध्यात्म आणि विज्ञानाचि सांगड घालणारा तारा कायमचा निखळ याची भावना व्यक्त होत आहे आज आज सायंकाळी ५.३० वाजता नांदेड हुन पोलीस बंदोबस्तात त्यांचे पार्थिव अहमदपूर येथील भक्ती स्थळाकडे रवाना करण्यात आले आहे.