तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षक दिन साजरा
कनिष्ठ मविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. आर.बी.वाले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
महाराष्ट्र २४ आवाज
तळा(श्रीकांत नांदगावकर) तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, कला-वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गो.म.वेदक विद्यामंदीर, डाॅ.प्र.म.जोशी प्रशाला पन्हेळी व प्राथमिक विद्यामंदीर यांच्या वतीने आज ५ सप्टेंबर रोजी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, तळाच्या सभागृहामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियमांचे पालन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या शिक्षक दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री आर.बी.वाले यांना डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची संधी संस्थेने दिल्याने ख-या अर्थाने सर्व शिक्षकांचा सन्मान केल्याची भावना शिक्षकांच्या चेह-यावर दिसून येत होती. याप्रसंगी प्रास्ताविक वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.भगवान लोखंडे तर गो.म.वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, प्राथमिक विद्यामंदिराचे चेअरमन श्री किरणशेठ देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.श्री वावेकर सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.