कोरोनाच्या वाढत्या प्रकाराने रामराज पंचक्रोशी भयभीत

कोरोनाच्या वाढत्या प्रकाराने रामराज पंचक्रोशी भयभीत


महाराष्ट्र २४ आवाज



(अलिबाग-जयप्रकाश पवार)रायगड जिल्हात सध्या कोरोनाच्या वाढत असलेल्या रूग्णांमध्ये अलिबाग तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोना मृताचां आकडा ही वाढत आहे. हा वाढता प्रभाव तालुक्यातील रामराज पंचक्रोशीत झपाट्याने पसरत असल्याने इथल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सुरूवातीच्या काळात एखादा दूसरा रूग्ण सापडल्यानंतर त्या गावात कडक निर्बंध लावले जात असत मात्र आजच्या परिस्थितीत पाहिले असता काही गावांत संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असतांना त्यांच्या घरातच त्यांना काॅरन्टाईन करण्यात येत असून कुठल्याही प्रकारची विशेष काळजी व गांभीर्य शासनाकडून घेण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


अशीच परिस्थिती राहिली तर यापुढे गावच्या गावं कोरोना बाधित होवून भयानक परस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असा सूर नागरिकांमधून निघत आहे. तेव्हा या वाढत चाललेल्या प्रकाराची तातडीने आरोग्य विभागाने व सबंधीत शासकिय अधिकार्यांनी वेळीच दखल घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image