मायक्रोफायनान्स कंपन्यानी दबाव टाकून कर्ज वसुली करू नये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत (लातुर)

मायक्रोफायनान्स कंपन्यानी दबाव टाकून कर्ज वसुली करू नये


जिल्हाधिकारी जी. श्रीकांत (लातुर)


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


लातूर : जिल्ह्यातील सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्जदारांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना योग्य ती काळजी घ्यावी. तसेच सध्याची कोरोना ची परिस्थिती पाहून कर्ज वसुली मोहीम राबवावी. ही कर्ज वसुली करत असताना कोणत्याही कर्जदार व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.


     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप कुलकर्णी, श्री. रामटेके यांच्यासह सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.


    जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, सर्व मायक्रोफायनान्स कंपनी रिझर्व बँकेच्या नियमानुसार कर्ज वाटप करतात. तसेच रिझर्व बँकेच्या नियमानुसार कोरोना काळात मार्च ते ऑगस्ट 2020 मधील कर्जाचे हप्ते हे वाढवून देण्यात आले होते व त्यावरील सर्व व्याज हे शेवटच्या हप्त्यात वसूल केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.


    त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्जाची वसुली करताना सध्याची कोरोना ची परिस्थिती पाहता विशेष काळजी घ्यावी व वसुली करताना कर्जदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी व सर्व कर्ज वसुली करण्यात यावी. कोणतेही कर्ज व त्यावरील व्याज माफ होणार नाही हे सर्व कर्जदारांनी ही लक्षात घ्यावे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image