रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा
महाराष्ट्र २४ आवाज
रायगड : (नितीन लोखंडे )प्रादेशीक हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार २१ व २२ सष्टेबर २०२० या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे, इलेक्ट्रीक बोर्ड, विजेचे खांब यांपासून नागरीकांनी दुर उभे रहावे. नागरीकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.संपूर्ण जगावर असलेले कोरोनाचे संकट, कोकणात आलेले निसर्ग चक्रीवादळाचे संकट आणि आता परतीच्या पावसामध्ये दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा या सर्व संकटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टिमुळे उभ्या भात पिकांचे नुकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हातातून निघून जाणार या विवंचणेन इथला शेतकरी चिंताग्रस्थ आहे. लाॅकडाऊनमुळे बंद पडलेले लोकांचे रोजगार हाताला काम मिळत नाही निसर्गाचे एकामागून - एक आलेले संकट त्यामुळे आता जगावे कसे असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडलेला आहे. अतिवृष्टीमुळे नागरीकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.