वनअधिकाऱ्यांच्या छाप्याने खैर माफियांचे धाबे दणाणले.आता प्रतिक्षा वनमाफियांचे आश्रयदाते असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची.

वनअधिकाऱ्यांच्या छाप्याने खैर माफियांचे धाबे दणाणले.आता प्रतिक्षा वनमाफियांचे आश्रयदाते असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची.


महाराष्ट्र २४ आवाज



रोहा/समिर बामुगडे.


 दक्षिण रायगडमध्ये वन अधिकाऱ्यांच्या मदतीने अवैध खैर व वनउपज तस्करीचे वृत्त झळकताच सर्वत्र खळबळ माजली .परिणाम स्वरूप माणगाव तालुक्यांतील मुगवली, जावळी परिसरातील आर.डी.वाॕटरपार्क येथे छापा टाकण्यात आला. याठिकाणी सरकारी वनातील खैर जातीचा माल चोरुन आणुन त्याचा अनधिकृत साठा आर. डी .वॉटरपार्कचे मालक विकास जाधव व मँनेजर सुनिल कृष्णा कोरपे यांनी केला होता.हि बातमी समजताच दक्षिण रायगडचे DFO राकेश शेफट यांनी आपल्या पथकासह जाऊन तडक कारवाई केली. ह्या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी समर्थन आणि स्वागत केले आहे. रोहा वनविभागाचे फिरते पथक नेहमी माणगाव मध्ये दिसत असते पण त्यांना हे दिनदहाडे चालणारे प्रकार कधीच दिसले नाहीत का? फिरते पथक मांडवली करण्यासाठी ,माफियांच्या संरक्षणासाठी फिरते कि काय असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत .



महाड DFO येऊन कारवाई करतात तर मग रोहा वनविभागाने आजवर ह्या वनमाफियांना आश्रय दिला होता का? मांडवलीसाठी ,हप्ते वसुलीसाठी येणारे ते खंडणीखोर वनअधिकारी कोण? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे . महाड तालुक्यांतील नाते, आचरोली, बिरवाडी परिसरातील चार मोठया वनतस्करांवरील कारवाई अद्याप प्रतिक्षीत आहे . खैर तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे .


   मुगवलीच्या कारवाई प्रमाणे वनविभागाने आपला मोर्चा आता महाड तालुक्याकडे वळवावा अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे .


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image