कोविड विद्यार्थी पालक अभियानात सर्वानी सहभागी व्हावे
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष युवराज कांडगिरे यांचे आवाहन
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- विकास भंडे
उदगीर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित कोविड विद्यार्थी-पालक अभियान प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा गव्हाणे व मराठवाडा अध्यक्ष प्रंशात कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोना विषाणूला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन आपण या अभियानाच्या माध्यमातून करत आहोत.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने आपण सर्वांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि विद्यार्थी यांच्या मधील दुवा व्हावे. कोविड विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना हे जग सोडून गेले त्या आपल्या विद्यार्थी मित्रांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात आपण द्यायला हवा ही सामाजिक जबाबदारी समजून घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या अभियानात सामील होत जास्तीत जास्त विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील दुवा होण्याचं काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूरचे जिल्हाध्यक्ष अॅङ.आशिष वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सदरील उपक्रम लातूर जिल्ह्यात राबवणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष युवराज कांडगिरे यांनी सांगितले आहे व ज्या गरजू विद्यार्थ्यांना सदरील उपक्रमाच्या माध्यमातून मदत हवी आहे त्यांनी पुढील नंबर वर संपर्क साधावा 9168531010 असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड आशिष वाघमारे यांनी केले आहे.