मराठा क्रांती मोर्चा तर्फे तळा तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) मराठा क्रांती मोर्चा तळा तर्फे तहसील कार्यालयासमोर दि.२५ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.अशातच महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू केल्याने याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सकळ मराठा समाज तळा तालुका समन्वयक चंद्रकांत राऊत, नगराध्यक्षा सौ.रेश्मा मुंढे, क्षत्रिय मराठा समाज तळा तालुका अध्यक्ष श्री.बाळाराम चव्हाण, सचिव दीपक भोसले, ऍड. चेतन चव्हाण, ऋषिकेश गोळे, नाना दळवी, रमेश सकपाळ, विनायक मुंढे,जगदीश शिंदे,विलास कदम, नरेश सुर्वे, प्रवीण आंबारले,मंगेश मोरे,निलेश गोळे,चंद्रकांत शिंदे,बाळू कदम,संदेश कदम व बहुसंख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे ती उठविण्यात यावी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पोलीस भरती करू नये अन्यथा येत्या १० ऑक्टोबर ला मोठे आंदोलन करण्यात येईल यांसह इतर मागण्यांचे निवेदन सामाजिक अंतराचे पालन करून तहसीलदार ए.एम.कनशेट्टी यांना देण्यात आले.यावेळी तालुक्याचे नेते दिवंगत अनंत ऊर्फ बाळशेठ लोखंडे यांना सकळ मराठा समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.