उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यात यावी. सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांची रिझर्व बँकेकडे मागणी.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यात यावी. 


सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांची रिझर्व बँकेकडे मागणी. 


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


लातुर : दि. २६ - उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबाद ही मराठवाड्यातील एकमेव मोठी बँक आहे. या बँकेत सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. या बँकेचे विद्यमान संचालक मंडळ मागील चार-पाच वर्षांपासून अत्यंत बेजबाबदारपणे व आरबीआयच्या मापदंड परिपत्रकाचे पालन न करता स्वहितासाठी नियमबाह्य व मनमानी काम करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपत असल्याने मागील वर्षभरात तर नियमबाह्य व स्वतःच्या स्वार्थापोटी बेभान होऊन कर्जदाराची उत्पन्न क्षमता न पाहता कोट्यावधी रुपये कर्ज वाटपाचा सपाटाच लावला असल्याचे बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. 



बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक २४/०९/२०२० रोजी संपलेली आहे. संचालक मंडळाची मुदत संपली असल्यामुळे ताबडतोब बँकेच्या नवीन संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक असताना तसा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न करता व सदरील संचालक मंडळास केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांची संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली नसताना सुद्धा सदरील संचालक मंडळ बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जी की बँकेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून ती सर्वसाधारण सभा दिनांक १८/१०/२०२० रोजी घेण्याचा प्रयत्न चालू आहे. नागरी सहकारी बँका साठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासंबंधी माननीय केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांनी अटी व नियम तसेच सर्वसाधारण सभा कशाप्रकारे घेण्यात यावी यासंबंधीचे मार्गदर्शक तत्वे व सूचना दिनांक २५/०८/२०२० रोजी परिपत्रक काढून कळविलेले असताना त्या नियमांचे पालन न करता ही सभा घाईगर्दीत घेऊन मागील आर्थिक वर्षातील नियमबाह्य केलेल्या कामकाजास व आर्थिक व्यवहारास मान्यता घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो की बँकेच्या हिताच्या दृष्टीने व ठेविदारांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. असा सावधानतेचा इशारा ज्येष्ठ पत्रकार व बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी एका निवेदनाद्वारे रिझर्व बँक ऑफ इंडिया यांना दिला आहे. 


तसेच उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबादच्या बेकायदेशीर व नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई आणि जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्बन बँक विभाग नागपूर यांच्याकडे व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image