संस्थेची वेबसाईट लोकार्पण सोहळा संपन्न
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- प्रभाकर शिंदे
नागपूर :- सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था, व्दारा आयोजित रविवार दि १३ सप्टेंबर २०२० रोजी दू १२ वाजता मुक्ता साळवे सार्वजनिक ग्रंथालय नागपूर येथे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव सभारंभ व संस्थेच्या वेबासाईटचे लोकार्पण सोहळा झूमअॅपवर मोठया उत्साहात पार पाडला, या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे प्रसिध्द विचारवंत प्रा.डाॅ.शरद गायकवाड, उद्घाटक जातपडताळणी विभागीय उपायुक्त मा आर.डी.आत्राम तर प्रमुख वक्ते म्हणून रत्नागिरीचे शिव, शाहू महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश नाईक यांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी मंचकावर पूरुषोत्तम कांबे ,सुभाष साळवे उपस्थित होते. सोहळ्याचे प्रास्ताविक मनिष अडागळे यांनी, अमित वाघमारे व प्रंशात वानखेडे यांनी पाहूण्याचा परिचय करून दिला. सुत्र संचालन कु. काजल कांबळे यानी तर आभार कु. सोनू डोंगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वतेसाठी प्रा. किरणकूमार मनुरे, प्रा. मिलिंदजी घाटे ,राजेश वानखेडे,गोपाल वानखेडे, राजू खडसे, संतोष नृपनारायण, देवेन्द्र खडसे ,उल्हास वानखेडे, गोविद वाळसे,श्रीकांत हत्तीठेल्ले, नामा डकरे,प्रकाश तायवाडे, कूंदन गायकवाड, राजू वानखेडे,प्रविण संनेसर लोकार्पण सोहळ्याचे मुख्य संयोजक मा. प्रभाकर शिंदे यांनी लोकार्पण सोहळा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.