जातिवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी प्राचार्यासह प्राध्यापकावर गुन्हा दाखल
अंजनगाव राधाबाई सारडा महाविद्यालयात जातवर्ण भेदभाव
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव तालुक्यातील राधाबाई सारडा महाविद्यालया मध्ये कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रमोद दाभेराव ह्यास उच्च वर्णीय प्राचार्य व त्याचा सोबती प्राध्यापक ह्याने जातीवाचक शिविगाळ व बहिष्कृत केल्यासारखी वागणुक दिल्याप्रकरणी अंजनगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. ज्यामुळे तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून वारंवार ह्याच शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी व प्राध्यापकांवर कसे काय अश्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात हा चर्चेचा विषय बनला आहे.
अंजनगांव सुर्जी तालुक्यातील राधाबाई सारडा महाविद्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेल्या प्रमोद वासुदेव दाभेराव (४८) रा .स्वप्ननगरी अंजनगांव सुर्जी यांनी दिलेल्या तक्रारी नूसार प्राचार्य श्री वशीष्ठ चौबे आणि प्राध्यापक नितीन सराफ हे जाणीवपुर्वक दाभेराव यांना त्रास देत होते. कनिष्ठ लिपीक असतांना सूद्धा बहिष्कृत केल्याप्रमाणे त्यांच्याकडून कार्यालयाची साफासफाई करायला लावत होते. तसेच २९ फेब्रु २०२० ते २८ मार्च २०२० पर्यंत दाभेराव यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आले असल्याचे तक्कार अर्जात म्हटले आहे. महाविद्यालयातीलच प्रा. संजय देशमुख यांच्यासह एक चौकशी समीती नेमण्यात आली होती. देशमुख यांच्या अहवालात प्रमोद दाभेराव यांची काही चूक नसल्याचे दाखवण्यात आले. प्रमोद दाभेराव यांच्या बाजुने अहवाल केल्यामूळे प्रा. देशमुख यांचे देखील दोन वेतनवाढ रोखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पुन्हा प्रा.आठावले यांच्या मार्फत दुसरा अहवाल तय्यार करवून घेतला ज्यात प्रमोद दाभेराव यांना दोषी दाखावण्यात आले. महाविद्यालयाने केलेली ही सर्व कार्यवाही प्राचार्य चौबे आणि प्रा.सराफ यांच्या संगणमाताने जातीय द्वेशातुन केली असल्याचे तक्रारित म्हटले असुन प्रमोद दाभेराव यांना जिवे मारण्यची धमाकी दिली आहे. प्रमोद दाभेराव यांनी दिलेल्या तक्रारी नूसार कलम २९४ ,५०६, ३४ भादवि सह कलम ३(१) (आर.)(एस) अनूसूचीत जाती प्रतिबंधक कायदा नूसार गुन्हे दाखल करण्यत आले असून यामुळे संपूर्ण तालूक्यात एकच चर्चे चा विषय ठरला आहे.
राधाबाई सारडा महाविद्यालया मधील पदाधिकाऱ्यांवर व प्राध्यापक यांचे विरुद्ध वारंवार दाखल होणारे गुन्हे शहरात चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसापूर्वी कॉलेज समितीच्या पदाधिकाऱ्यांवर देखील जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर एका प्राध्यापकावर स्त्री जातीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अशा प्रकारे प्राचार्य, प्राध्यापक व समितीचे पदाधिकारी वारंवार चर्चेत असतात. राधाबाई सारडा महाविद्यालय अत्यंत पुरातन नामांकित व प्रतिष्ठीत शिक्षण संस्था आहे. मात्र काही काळा पासून संधिग्ध गुन्ह्यात असणारी चर्चा प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे.
एसडीओ पी सोमय्या मुंढे व पोलीस निरीक्षक राठोड यांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास पो. उप. निरीक्षक राजेश जावरे करीत असले तरीही जातीवाचक शिवीगाळ करण्याचे प्रकरण असल्यामुळे कायदेशीर दृष्टया एसडीओपी सोमय्या मुंढे हे त्या गुन्ह्यात चौकशी करणार आहेत.