माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेला ग्रामपंचायत मांदाड विभागामध्ये भरघोस प्रतिसाद
महाराष्ट्र २४ आवाज
तळा (नितीन लोखंडे)संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून कोवीड १९ या विषाणूला हद्दपार करण्यासाठी शासन आणि प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. नुकतीच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेची सुरूवात राज्यात १० सप्टेंबर २०२० पासून सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम कोवीड १९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यु दर कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ही मोहीम राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधिल खेड्या पाड्यात राबविण्यात येत आहे. या साठी प्रशासनातर्फे लोकसंख्येच्या प्रमाणात नागरीकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथके स्थापन करण्यात आली आहेत. या मधे स्थानिक प्रतिनिधी, आरोग्य सेवक, आशा वर्कर , स्वयंसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी १५०० आरोग्य पथके स्थापना करण्यात आली आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन करत आज ग्रुप ग्रामपंचायत मांदाडचे संरपंच श्री. तानाजी कालप यांच्या उपस्थितीत तळा तालुक्यातील कुडे येथे सर्व नागरीकांची ऑक्सिमिटर आणि थर्मल स्कँनींगच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. यावेळी स्थानिक प्रतिनिधी,आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते. या मोहिमेला राज्यातून सर्व नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.