माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा -गटविकास अधिकारी व्ही.व्ही. यादव
महाराष्ट्र २४ आवाज
तळा (कृष्णा भोसले) माझं कुटुंब माझी जबाबदारी या राज्यशासनाने जाहिर केलेल्या मोहीमेला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन तळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही.व्ही.यादव यांनी केले आहे.
सोनसडे ग्रामपंचायतीच्या कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी सरपंच माधुरी पारावे,सदस्य परशुराम वरंडे, महिला बालकल्याण तळा प्रकल्प अधिकारी वैशाली शिंदे, ग्रामसेविका तांबडे मॅडम,गाव समिती अध्यक्ष, सचिव, आशाताईं, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना यादव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या मोहीमेला १० सप्टेंबर ते १०आॅक्टोंबर हा पहीला टप्पा असून यामध्ये आशावर्कर , अंगणवाडी सेविका आपल्या गावातील घरोघरी जाऊन सर्व सदस्यांची शरीरातील तापमान, व अॉक्सिजन लेव्हल यांची तपासणी करणार आहेत. सर्दी, ताप, डोकेदुखी, त्याचबरोबर
ह्रदय रोग, मधुमेह यांचीही माहिती घेणार आहेत.याबाबत लोकांमध्ये जनजागृती, समुपदेशन, यानिमित्ताने होणार आहे.कुणीही कोणत्याही अफवा,गैरसमज यानां बळी न पडता आपल्या घरी येणा-या शासकीय कर्मचारी, स्वंयसेवक यांना सर्वांनी सहकार्य करावे. कुणीही घाबरून न जाता आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. असे आवाहन नागरिकांना केले आहे.
कोरोनाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिक उत्सूक दिसत होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेता शासनाला सहकार्य करावे असेही शेवटी त्यांनी सांगितले.