पांडुरंग रायकर पत्रकार यांचा उपचारा अभावी झालेल्या मृत्यूस जबाबदार कोण शासनाने चौकशी करून कार्यवाही करावी. - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांची मागणी.

पांडुरंग रायकर पत्रकार यांचा उपचारा अभावी झालेल्या मृत्यूस जबाबदार कोण ? शासनाने चौकशी करून कार्यवाही करावी. 


- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांची मागणी.


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


लातुर : दि. २ - पुणे येथील पांडुरंग रायकर या तरूण अभ्यासू पत्रकार मित्राचा कोरोनामुळे हाकनाक बळी गेला. पांडुरंग रायकर यांना वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही. ऑक्सिजन मिळाला नाही. आणि रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काही काळ थांबावे लागले. त्यामुळे एक तरूण पत्रकार मित्र योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेऊन गेला. व्यवस्थेच्या या गलथानपणा मुळेच पांडुरंग रायकर यांचा बळी गेला. या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र शासनाने चौकशी करून पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस जे कोण जबाबदार असतिल त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री श्री राजेशजी टोपे तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


शासनाने मान्यता दिलेल्या अनेक खाजगी कोविड covid-19 रुग्णालयातील आयसीयूतील बेड रिकामे असतानासुद्धा केवळ पैशासाठी उपचारा अभावी रुग्णास मृत्यूला सामोरे जावे लागत आसेल तर या अत्यंत गंभीर बाबिकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही केली पाहिजे. 


वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करत असताना राज्यात अनेक पत्रकार बांधव कोरोना बाधित झाले. तर कांही पत्रकारांचा कोरोना आजाराने मृत्यू झालं आहे. मृत्यू पावलेल्या पत्रकारांना कोरोना योद्धा जाहीर करून त्यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच शासनाने विनाविलंब देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी व्यंकटराव पनाळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष यांनी केली आहे. 


पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर तात्काळ कार्यवाही करावी. आणि पुन्हा उपचाराअभावी कोणत्याही पत्रकारावर अशी वेळ येणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घ्यावी असे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी मंत्री महोदयाकडे आपली भावना व्यक्त केली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image