प्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे अंगणवाडी कर्मचारी यांची मोफत अँन्टीजेन टेस्ट.
महाराष्ट्र २४ आवाज
तळा(नितीन लोखंडे)दि.४-एकीकडे शासन लाॅकडाऊनमुळे ठप्प झालेले जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी त्या-त्या विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन हळूहळू अनलाॅकच्या दिशेने वाटचाल करत आहे तर दुसरीकडे कोरोणाचा अटकाव करण्यासाठी , कोव्हीड१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात अँन्टीजेन टेस्टची मोहीम राबवली जात आहे.
संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुशंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र तळाचे वैद्यकीय अधिकारी श्री. अमोल बिरवाडकर यांनी पुढाकार घेऊन पंचायत समिती महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी कर्मचारी यांची अँन्टीजेन टेस्टची सुरुवात दिनांक १९ आॅगस्ट पासून टप्याटप्याने शासनाच्या अटी व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आली. अँन्टीजेन टेस्ट मध्ये रूग्णाच्या नाकातुन किंवा घशातुन स्वॅब घेतला जातो. या टेस्टचा रिपोर्ट अवघ्या अर्ध्या तासात मिळतो.
तळा तालुक्यातील जवळपास शंभर ते दिडशे अंगणवाडी कर्मचारी यांची अँन्टीजेन टेस्ट घेण्यात आली. याप्रसंगी तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बिरवाडकर, प्रयोगशाळा अधिकारी श्री. भोजने, आरोग्य सहाय्यक श्री. दिलीप झावरे, राजेश वाडेकर, तळा पंचायत समीती महिला व बालकल्याण सुपरवायझर श्रीमती. वंदना शिंदे आदी उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी डॉ. अमोल बिरवाडकर यांच्या नियोजनबध्द कामगिरीवर अंगणवाडी कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.