नगरोत्थान अभियानातंर्गत सुरु काम राम भरोसेच
नगर पालिकेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
पाण्याचे टाकीचे काम कासव गतीने
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव नगर परिषदेत अंतर्गत नगरोत्थान अभियाना अंतर्गत जीवन प्राधिकरण कार्यालया जवळ २५ लाख लिटर टाकीचे व १० लाख लिटर टाकीचे काम एमआयडीसी भागात सुरु आहे. ज्यामध्ये ऑफिस निर्मिती, गावात एस.टी.डी. पाईप लाईन जमिनी पासून एक ते एक दहा मीटर खोल आवश्यक त्या भागात टाकणे, हे कार्य सनराईज कंपनीला ६.२५ लक्ष (अबाऊ) रुपयांमध्ये दीलेले आहे. हे काम नगर पालिकेच्या अंतर्गत असून जीवन प्राधिकरणाचे सुपरव्हिजन मध्ये असल्याचे समझते.
सनराईज कंपनीने ह्या कामावर दोन अभियंता व एक सुपरवायझर ची नेमणूक केली आहे. वेळोवेळी असणाऱ्या आवश्यक कामासाठी जीवन प्राधिकरणाचे अभियंता शेंडे बांधकाम विभागाचे टेक्निकल नसताना देखील ह्यांची उपस्थिती असल्याचे दिसते. मात्र नगर पालिका अभियंता त्या ठिकाणी हजर नसल्याचे समजते. शासनाच्या लोकहितार्थ चालविल्या जाणाऱ्या ह्या उपयुक्त योजनेचा नगर पालिका स्वार्थ लाटण्यासाठीच उपयोग करीत असल्याचे लक्षत येत आहे. आरोग्य विभाग प्रमुख वाटाणे ह्यांचे सोबत ह्या विषयाची चर्चा केली असता. मी बांधकाम कार्याचा टेक्निकल नाही. त्यामुळे मी नगर पालिकेत वारंवार सूचित केले व तसे पत्र देखील दीले.
ह्यावरून त्या कामात सर्वांचे हात ओले झाले असावे यांची दाट शक्यता आहे. सध्या रुजू झालेल्या मुख्याधिकारी अलोणे व नगराध्यक्ष कमालकांत लाडोळे यांनी त्या संराईझर याचे कर्मचाऱ्या सोबत न. प. कार्यालयात मिंटीग घेतली. परंतु नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी यांचे लक्षात आले नाही की नागरिकांन पासून नगर पालिकेला हे कार्य कोणत्याही निधीतून सुरु आहे. किती कोटीचे काम आहे? त्या कामाची रूपरेषा काय? हे माहिती दर्शक फलक त्या कामाच्या दर्शनीय ठिकाणी लावण्यात आलेले नाही. त्या कामावर येणारी रेती देखील योग्य नाही? त्या कामावर मजुरांचे अथवा त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. मजुरांच्या अचानक होणाऱ्या किरकोळ अपघाता साठी फस्ट स्टेज बॉक्स नाही. विधुत विज वितरक कंपनीचे मीटर नाही. चोरट्या प्रकारे विधुत घेऊन खड्ड्यातील पाण्याचा उपसा केला जातो. काम सुरु असणाऱ्या ठिकाणावर ऑफिस नाही. ह्यासर्व त्रुट्या असताना स्थानिक प्रशासन चूप का ह्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अंजनगाव नगर पालिकेच्या अकार्यक्षम शीरपेचात आणखी एक तुरा लावल्या गेला असून नगर पालिकेचे कार्य जनहित की स्वहित हाच चर्चेचा विषय बनला आहे.
आम्ही टेंडर नुसार काम करण्यासाठी तय्यार आहोत. कारण हे काम आमच्याच रहिवासी तालुक्यातील आहे. परंतु आमच्या अडचणी समजून न घेता होणारा त्रास कामात अडचण निर्माण करणारा आहे. शहरात एस. टी. डी. पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र प्रत्येक भागात एकच वेळी कशी पाईप लाईन टाकल्या जाईल. हे विचार करण्यासारखे आहे. असे त्या कामावर नियुक्त अभियंता यांनी सांगितले.