जागतिक औषध निर्माता दिनी कै. के.डी. पाटील यांच्या कुटुंबियांना ४२,०००रू.ची मदत.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना शाखा रायगड च्या वतीने कोरोना सोबत लढताना मृत पावलेले कै.के डी पाटील यांच्या कुटुंबीयांना ४२,०००रू.चा धनादेश रा.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या हस्ते देण्यात आला.तसेच येत्या १५ दिवसांत सदर कुटुंबियांना विमा संरक्षणाचा लाभ निर्गमित केला जाईल असे आश्वासन देखिल मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. सदर कार्यक्रमाकरीता रायगड जिल्हा औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा कोकण विभागीय अध्यक्ष श्री निलेश कार्लेकर, सचिव श्री सुदेश पाटील, मुख्य सल्लागार श्री जितेंद्र पाटील, सदस्य श्री विकास पाटील,खजिनदार श्रीम मधू वर्तक उपस्थित होते. सदर धनादेश रक्कम जमा करणे कामी रायगड जिल्ह्यातील औषध निर्माण अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.जागतिक औषध निर्माता दिनाच्या निमित्ताने सर्व औषध निर्माण अधिकारी यांनी केलेले हे कार्य नक्कीच सर्वांसाठी आदर्श ठरेल.