कोरोना रुग्णांची वाढती संख्या तळा तालुक्यासाठी धोक्याची घंटा.
एकाच दिवशी आढळले तब्बल २१ कोरोना बाधित.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या तळा तालुक्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मंगळवारी उशिरा हाती आलेल्या अहवालात तळा तालुक्यात एकाच दिवशी २१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.ज्यामध्ये ११ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे.रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून तळा तालुक्याची संख्या सर्वात कमी प्रमाणात होती मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यापासून दिवसागणिक १ ते २ सापडणाऱ्या रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन शतकाच्या जवळ पोहचली आहे.त्यामुळे कोरोना विषाणूला रोखणे प्रशासणासाठी मोठे आवाहन ठरत आहे.तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ९५ पर्यंत जाऊन पोहचली आहे.४३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे ४ मयत तर ४८ जणांवर उपचार सुरू आहेत.