कुडे येथील लेणी विकासाला मिळणार गती

कुडे येथील लेणी विकासाला मिळणार गती


महाराष्ट्र २४ आवाज            



   तळा(कुडे) नितीन लोखंडे : रायगड जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांनी पर्यटन विभागाची कॅराव्हॅन व अॅडव्हॅन्चेअर टुरिझम पाॅलिसी बाबत त्याचबरोबर तळा तालुक्यातील कुडे येथील लेणी पर्यटन विषयक विकासाबाबत मंत्रालयामध्ये पर्यटन संचालनालय अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली.


जगाच्या इतिहासामध्ये तळा तालुक्यातील कुडे येथील लेण्यांची नोंद आपणास पहावयास मिळते. ही एक महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. जगाच्या कानाकोपरऱ्यातून पर्यटक या ठिकाणी ये -जा करीत असतात. लेण्यांमधील कोरीव काम , शिलालेख, पाली भाषेतील लिपी, लेण्यांचा आजू- बाजूचा परिसर, लेण्यांच्या समोरील अथांग समुद्र पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटन क्षेत्राचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लेण्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.गेली कित्येक वर्ष पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याने कुडे येथील लेण्यांचा पर्यटनाच्या दुष्टीकोनातून विकास होऊ शकला नाही. या ठिकाणी मुलभूत सोई सुविधेचा अभाव असल्याने पर्यटक नाराज होतात. म्हणून रायगड जिल्हा पालकमंत्री तथा उद्योग, खणिकर्म, विधी व न्याय, पर्यटन राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांनी विषेश लक्ष देऊन कुडे लेणीच्या पर्यटनविषयक विकासाबाबत अधिकारी यांच्याशी मंत्रालयामधील दालनात चर्चा केली. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image