" माझे कुटुंब-माझी जबाबदारी" मोहिमे अंतर्गत महागाव ग्राम पंचायती कडून महागाव हद्दीत घरोघरी तपासणी
महाराष्ट्र२४आवाज
तळा (अनंत खराडे)गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वचजण कोरोना विषाणूशी लढाई लढत आहोत. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन आणि प्रशासनही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा सर्वत्र वाढत असलेला प्रादूर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ सप्टेंबरपासून शासनाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ केला असून जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या शासनाच्या आरोग्य तपासणी पथकाला उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी येथे केले होते.त्या अनुषंगाने महागाव विभागातील महागाव ग्रुप ग्राम पंचायतीकडून पंचायत हद्दीतील घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली. यावेळी महागाव सरपंच सुषमा कजबले ग्रामसेविका ताबडे आरोग्य सेविका विशाखा शिके ग्राम पंचायत कर्मचारी तुकाराम राणे कालेकर, अंगनवाडी सेविका , आशा सेविका ग्राम पं कर्मचारी रोशन फराडे. इत्यादि उपस्थित होते.