जाती धर्माच्या पलिकडे जाऊन माणूसकी आली धाऊन !
महाराष्ट्र २४ आवाज
रोहा (नजीर पठाण) रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील परळी येथील रहिवासी संजय कदम (वयं 46 वर्ष) यांचे रोहा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड १९ मुळे निधन झाले. या निधणाची बातमी समजताच जाती धर्माच्या पलिकडे जावून माणूसकी धाऊन आली आहे.
मृत व्यक्तीचा मुलगा आणि मेहुणे प्रवीण गायकर यांना मदत करण्यासाठी रोहा अष्टमी येथील ( मन्सूर नाडकर, एजाज वास्कर आणि जावेद नाडकर ) या तीन मुस्लिम तरुणांना घेउन
त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक उत्तम उदाहरण आहे आणि हेच दर्शवते की मानवतेचा धर्म हाच खरा धर्म आहे.
हिंदू मुस्लीम शिख ईसाई हम सब भाई भाई। ही शिकवण रोहा येथील मुस्लीम बांधवानी दिलेली आहे.