कारधा येथील राशन दुकानदार शिवचरण कुरंजेकर यांचा कोरोना मुळे मृत्यू

कारधा येथील राशन दुकानदार शिवचरण कुरंजेकर यांचा कोरोना मुळे मृत्यू


महाराष्ट्र 24 आवाज



उपसंपादक- संजीव भांबोरे


भंडारा - भंडारा तालुक्यातील रास्त भाव दुकानदार शिवचरण शकरूजी कुरंजेकर वय - 73 रा , कारधा यांचे आज दिनांक 25/ 9/2020 ला दुपारी 3.30 वाजता कोरोना मुळे डॉ. चौधरी यांच्या दवाखान्यात दुःखद निधन झाले. शासनाने रास्त भाव दुकानदारांना सॅनिटायझर, मास्क, हँडग्लोग्ज, त्याचप्रमाणे सुरक्षा विमा कवच 50 लाख सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. दो गज की दुरी असे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. परंतु रास्त भाव दुकानदारांना पास मशीनवर कार्डधारकांचे थंब घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष संबंध येतो. शाशन रास्त भाव दुकानदारांच्या जीवनाशी खेळत असून मृत्यूला आमंत्रण देत आहेत. शासनाने कोरोना मुळे मृत्यू झालेल्या वारसदारांना तात्काळ 50 लाख विमा कवच जाहीर करावा अशी मागणी राशन दुकानदार संघटनेचे नेते ओमप्रकाश थानथराटे , संजीव भांबोरे , हितेश सेलोकर, राजू सतदेवें, राजेश भुरे यांनी केलेली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image