पत्रकार भारत सोनकांबळे यांचा राजमुद्रा ग्रुप महाराष्ट्र राज्य चा कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मान .
महाराष्ट्र २४ आवाज
नांदेड,मुखेड( विशाल पवार) लॉकडाऊन काळातील संकटमय काळी आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाची वास्तव व विदारक परिस्थिती आपल्या पत्रकारितेतून सातत्याने लिखाण करून जगासमोर ठेवलेले युवा निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे यांना राजमुद्रा ग्रुप महाराष्ट्र राज्य चा दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी राजमुद्रा ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सचिन पाटील इंगोले, प्रदेशाध्यक्ष प्रसाद पाटील तेलंग, पंकज भाऊ गायकवाड,आरिफ भाई पिंजारी अदनान पाशा, भीम आर्मीचे आशिष भाऊ भारदे सचिन चव्हाण यांच्या हस्ते, कोरोणा योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
पत्रकार भारत सोनकांबळे हे पत्रकारिता क्षेत्रातील युवा पत्रकार निर्भीड व धाडशी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र परीचय आहे विविध क्षेत्रांमध्ये ते सातत्याने भाग घेतात.
त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील व सामाजिक कार्याच्या कार्य कृतत्वामुळे सलग दुसऱ्यांदा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यच्या मुखेड तालुकाध्यक्षपदी फेर निवड झाली. तालुक्यातील
बेटमोगरा येथील रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून त्यांनी अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबवून आपल्या कार्याचा तालुकाभरात आपले नाव लौकीक केले आहे.
निसर्गाच्या रुपाने त्यांना अनेक कला अवगत आहेत, आपल्या बुद्धीच्या जोरावर व लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेतून अन्याय अत्याचाराला वाचा फोडली व या लॉकडाऊन काळातही आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोणा विषयी लिखाण केले एवढेच नाही तर त्यांच्या लेखनाची व धाडसी वृत्तीची दखल घेऊन राजमुद्रा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पत्रकार भारत सोनकांबळे यांना कोरोणा योद्धा म्हणून पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या पुरस्कार व सन्मान मिळाल्याबद्दल मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ.तुषार
गोविंदराव राठोड, डॉ.वीरभद्र हिमगिरे जिल्हा परिषद नांदेड चे माजी अध्यक्ष मा. दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, बेटमोगरा नगरीचे सरपंच सौ. पद्मजा खुशालराव पाटील, मा. दत्तात्रय बालाजी पाटील बेटमोगरेकर (कृ.उ.बा.स.संचालक,मुखेड),
मा.राहुल लोहबंदे,(माजी नगरसेवक), मा.गंगाधर सोंडारे, मा.के.एन.कांबळे गुरुजी, मा.अनिल सिरसे (जिल्हाध्यक्ष रि.प.सेना नांदेड), डॉ.राहुल कांबळे (पशुधन विमा अधिकारी नांदेड), युवक कॉंग्रेस चे कार्याध्यक्ष आरोग्य रत्न डॉ.रणजीत काळे, ललिताबाई सोनकांबळे, रामजी सोनकांबळे, दिपक सोनकांबळे, हरी कांबळे, दिलीप सोनकांबळे, भगवान सोनकांबळे, राहुल सोनकांबळे, आदींनी अभिनंदन केले.