सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांचा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने बहिष्कार
मामला जाहिरातीच्या पैशाचा
मात्र सदर प्रकरण व्यक्तिगत असल्याची पुष्टी
घोगरे यांचीच थकबाकी ऋषिकेश कडे असल्याचे स्पष्ट
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव शहरातील पंचायत समिती मध्ये दि. ०२ सप्टेंबर रोजी सरपंच पुरुषोत्तम घोगरे आणि पत्रकार ऋषिकेश वाघमारे यांचे मधात तुतुमैमै झाली. ज्यामध्ये घोगरे यांनी पत्रकाराना असभ्य बोलचाल केल्याचा आरोप वाघमारे यांनी लावला ज्यामुळे पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने तात्काळ मिटटींग घेऊन सर्वानू मते निर्णय घेण्यात आला. की कोणताही पत्रकार पुरुषोत्तम घोगरे यांचे बातम्या प्रकाशित करणार नाही. घोगरे ज्या कार्येक्रमात असतील त्या कार्येक्रमाचा बहिष्कार करतील. कारण तालुक्यातील सर्व पत्रकार यांना असभ्य भाषेत बोलचाल करून घोगरे यांनी पत्रकारांचा अपमान केला आहे. पत्रकार जर कोणाला प्रसिद्धी देऊन त्याचे राजकीय भविष्य बनवू शकते तर त्याचे भविष्य देखील समाप्त करू शकते. जाहिरातीचे पैसे मागणे हा काही गुन्हा नसून तो व्यवहार स्वाभाविक आहे. वृत्तपत्र मात्र जाहिरातीच्याच आधारावर चालते. त्या पत्रकारास त्या जाहिरातीचा हिशोब द्यावा लागतो. जर जाहिरातीची रक्कम पाठविल्या गेली नाही तर पार्सल बंद केल्या जाते. अशात वाचकांचे नुकसान होते. त्याच प्रमाणे झालेला प्रकार पूर्णतः लांच्छनास्पद असून संपूर्ण पत्रकारांना असभ्य भाषेचा वापर केला जो निंदनीय आहे ज्यामुळे तालुक्यातील पत्रकार ह्या निंदनीय कृत्याचा निषेध नोंदवित आहे ह्यानंतर कोणीही पुरुषोत्तम घोगरे यांच्या बातम्या प्रसिद्ध करणार नाही अथवा ते ज्या कार्येक्रमास असतील त्या कार्येक्रमात कोणताही पत्रकार जाणार नाही असे पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष मनोहर मुरकुटे यांनी सांगितले.
पॉवर ऑफ मीडियाने सत्यता जाणून न घेता घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा.....
व्यक्तिगत बोलचालीस पॉवर ऑफ मीडियाने वादंगाचे रूप दीले. पत्रकार ऋषिकेश वाघमारे यांनी जेव्हा त्यांची युनिकॉर्न गाडी घेतली तेव्हा मी प्रत्यक्षात त्यांचा जमानतदार होतो .त्यांनी गाडी घेतल्यानंतर त्यांनी पैसे व्यवस्थित न भरल्याल्यामुळे माझ्या प्रॉपर्टीवर बोजा चढला होता. मी हे सर्व त्यांच्यासाठी करून व स्वतःपैसे देवुन सुद्धा पैशांसाठी त्यांनी माझी बदनामी केली. हे कितपत योग्य वाटते. या सर्व घडामोडी प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात. पण अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीची व झालेल्या परिस्तिथीची सत्यता जाणून न घेता बदनामी करणे योग्य नाही. हे मला तरी वाटते. चूक हे प्रत्येकाच्या कडुन होत असते आणि त्यात सुधारणा होणे हेही महत्त्वाचे असते. मी घटना झाल्या नंतर बऱ्याच पत्रकार लोकांना फोन केले होते की माझे काही चुकले असेल तर मला माफ करा. मी सर्व परिस्थिती देखील सांगितली पण त्यांनी हेतूपुरस्पर माझी बदनामी करून योग्य केले असावे असे मला तरी वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नकळत चुका माणसाकडून होत असतात. अशाप्रकारे बदनामी करणे योग्य नाही. वरील डॉक्युमेंट्स सर्वांनी वाचुन घ्यावे . आपण सर्व पत्रकार बांधव सुज्ञ आणी समजदार पणे सगळं सांभाळुन घेत असता. ज्यामुळे आपण सर्वांनी मला न्याय मिळवून द्यावा.
सरपंच पुरूषोत्तम घोगरे