परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानभरपाई बरोबर भूमिहीन शेत मजुरांना ही नुकसान भरपाई द्या शेतकरी बिबीशन गरड यांची मागणी

परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानभरपाई बरोबर भूमिहीन शेत मजुरांना ही नुकसान भरपाई द्या


शेतकरी बिबीशन गरड यांची मागणी


     महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक:-लक्ष्मण कांबळे


लातुर जिल्ह्यातील संपूर्ण तलाठी मंडळात (सज्जात) अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे,अनेक शेतकऱ्याच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे.तर काही शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या बनमी पाण्या सोबत गेल्या वाहून जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तपसे चिंचोली लाडवडी गाढवेवडी.पोमदेवी जवळगा लामजना किल्लारी , बेलकुंड , तळणी, उत्तका आदी गावातील शेतकऱ्यांनी काडून ठेवलेल्या सोयाबीनच्या बनमी परतीच्या पावसाने व त्यावर झापुन ठेवलेल्या चवाळे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने सोयाबीन च्या बनमी भिजून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे   


 सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई तात्काळ द्यावी मा मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व शेकरी व शेत मजुरांचा विचार करावा. शेतकऱ्यांना व मजुरांना तात्काळ मदत करावी .मुसळधार पावसामुळे ऊसाचे उभे पिक भुईसपाट केले 


【शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे ना चीज झाले आहे .हाता तोंडाला आलेला घास वादळी वाऱ्यासह पावसाने घेतला की काय असे शेतकरी वर्गातून चर्चा होताना दिसत आहे】


शेतमजूर शेतकऱ्यांच्या शेतातील हाता तोंडाला आलेला घास निसर्गाने घेतल्या मूळे आम्हा भूमिहीन शेत मजुरांना हाताला काम मिळत नाहीत त्यामुळे शेतकर्या बरोबर भूमिहीन शेतमजुरांना ही आर्थिक मदत देण्यात यावी म्हणून शेतमजुरा कडून ही अशी मागणी करण्यात येत आहे.


शेतकरी व शेतमजूर दुहेरी संकटात सापडला आहे त्या मुळे शासनाने शेतकऱ्याचे पंचनामे न करता सरसकट पन्नास हजार रुपयांची मदत करावी मदत करण्यासाठी शासनाने दिरंगाई केल्यास तिघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्याला व शेतमजुराला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा बिबिशन गरड तपसे चिंचोलीकर यांनी इशारा दिला आहे


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image