हाथरस प्रकरणातील मनिषा वाल्मिकी हिच्यावर अत्याचार करणा-यास फाशी द्या.
श्रमिक क्रांती व एकल महिला संघटनेची मागणी.
महाराष्ट्र २४ आवाज
नळगीर(मारूती गुंडीले) उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित लेकीवर सामुहीक अत्याचार करुन तिची क्रुरपणे हत्या करण्यात आली आसुन या घटनेचा श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र व एकल महिला संघटनेच्या वतीने दि. 11/10/2020 रोजी तिव्र निषेध करण्यात आला आहे,मनिष्याच्या मारेकर्यास फाशी देण्यात यावी, महिलांवरील होणारे अत्याचार थांबविण्याकामी सरकारने कडक पावले उचलावीत आशी मागणी नळगीर गावातील एकल महिला व श्रमिक क्रांती कार्यकर्तेनी केली आहे इतका भयंकर आत्याचार केला जाऊन सुध्दा प्रशासनाकडुन मनिष्याचे प्रेत तिच्या कुटुबांला विश्वात न घेता त्यांच्या ताब्यात न देता प्रेताची विल्हेवाट लावली आहे ही खुपच मानवि मनाला हेलावणारी व न्यायावर विश्वास ठेवणार्या मानवि मनाला दुखावणारी बाब आहे आशी प्रतिक्रिया या वेळी एकल महिलानी दिली आहे, ग्राम पंचायत नळगीर येथे एकत्र येऊन या घटनेचा संतप्त पणे निषेध करण्यात आला.आपल्या आब्रुचे रक्षण करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या बहिण मनिष्या हिस संघटनेकडून श्रध्दांजली ही वहाण्यात येऊन दुख व्यक्त करण्यात आले
या निषेध कार्यक्रमात एकल महिला संघटनेच्या ज्योती वाघमारे,रिहाना खादुभाई,तर श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र या संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख आर्चना ताई तोगरे, क्रांती महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभावती सोनकांबळे यांचे सह विस महिला उपस्थित होत्या,तर श्रमिक क्रांतीचे राजकुमार सुर्यवंशी, लक्ष्मण रणदिवे,विकास बलांडे,भरत सुर्यवंशी,प्रकाश गोरीले,किरण जाधव इत्यादी उपस्थित होते.