वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तळा तहसीलदार यांना निवेदन
महाराष्ट्र २४ आवाज
तळा ( सुरेंद्र शेलार) उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथे मनीषा वाल्मिकी हिच्यावर ज्या नराधमांनी अत्याचार केला त्याचा निषेध म्हणून आज सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर, २०२० रोजी तळा येथे मा.नायब तहसिलदार यांचेकडे तळा तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर मोरे आणि संपूर्ण तालुका कार्यकारिणीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तळा येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.